मुख्य सामग्रीवर वगळा

पत्रकार अनिल हुल्ले मारहाण प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीच्या दणक्याने गुन्हे दाखल..

 

सोलापुर | विशेष प्रतिनिधी
काळ्या बाजारात जाणाऱ्या रेशनचा पकडून विचारपूस करणाऱ्या सोलापुरातील आवाज महाराष्ट्राचा या न्युज चॅनल मधील पत्रकाराला सात रस्ता परिसरात २४ ऑक्टोंबर रोजी मारहाण झाले असून

Patrakar

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल चे पत्रकार अनिल हुल्ले यांना एका बातमी दाराकडून बातमी मिळाली होती की एक पिकअप छोटा हत्ती गाडी क्रमांक mh२५..P ४९९९ मधून रेशनचा गहू आणि तांदूळ, डाळ, विनापरवानगी बेकायदेशीर विक्रीसाठी सात रस्ता परिसरातून जाणार आहे. पत्रकार अनिल हुल्ले हे सात रस्ता परिसरात गाडीची वाट पाहत उभारले होते… एवढ्यात वरील क्रमांकाची गाडी सात रस्ता परिसरातून जात असताना अनिल हल्ले यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवण्याचा इशारा दिला… गाडीमध्ये ड्रायव्हर एक

क्लिनर व मागे एक मुलगा असे तीन व्यक्ती होत्या… या छोटा हत्ती गाडीत अंदाजे पाच टन धान्य होते.. सदरच्या रेशनच्या धान्याचा संदर्भात ड्रायव्हरला विचारणा केली असता व कागदपत्रे विचारले असता ड्रायव्हरने पत्रकार अनिल हुले यांना कागदपत्रे दाखले, मात्र ती कागदपत्रे सहा महिन्या अगोदर ची होती.. अनिल हुल्ले यांनी सदर चा मुद्देमाल व गाडी सदर बाजार पोलिस स्टेशन येथे नेण्यास सांगितले.

त्यावेळी ड्रायव्हरने दोन ते तीन व्यक्तींना बोलावून घेतले. व ती व्यक्ती येऊन तू कुठला पत्रकार आहे? कुठे राहतो? तू आमची शूटिंग का घेतो असे म्हणून धक्काबुकी व बेदम मारहाण करून मोबाईल फोडण्याचा प्रयत्न केला.. मोबाईल खाली पाडले… या वेळी ताबडतोब पत्रकार अनिल हुल्ले यांनी पोलिसांशी संपर्क साधला… मात्र पोलिसांशी संपर्क झाला नाही. शेवटी पत्रकार अनिल हुल्ले यांनी पोलीस आयुक्तालय गाठले.. मात्र तेथे ही त्यांना मदत मिळाली नाही.

अशातच रेशन चा धान्य घेऊन जाणारा गाडीवाला सातरस्ता परिसरातून पसार झाला. या सर्व प्रकरणाची हकीकत सांगण्यासाठी सदर बाजार पोलिस स्टेशन गाठले असता तेथे लवकर फिर्याद घेतली नाही , अखेर पत्रकार अनिल हुल्ले यांनी पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांना फोनवरून माहिती दिली.

पत्रकार सुरक्षा समितीचा दणका
सदर बाझार पोलिस स्टेशन येथे फिर्याद देण्यासाठी पत्रकार अनिल हुल्ले गेले असता पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे लक्षात येताच पत्रकार अनिल हुल्ले यांनी थेट पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांना फोनवरून माहिती दिली अवघ्या १५ मिनिटात पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार व धसका न्यूज नेटवर्क चे संपादक अक्षय बबलाद यांच्या समवेत पोलिस ठाण्यात दाखल होताच पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदाराने मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कलम ३२३ , ५०४ , व ३४ प्रमाणे संबंधितावर गुन्हे दाखल केले आहेत

               संपादक श्री नितीन चव्हाण


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोरगरीब रुग्णांसाठी भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्ष’चा पुढाकार

पुणे – प्रतिनिधी : कालिदास उबाळे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. निनाद संगिता मल्हारी टेमगिरे (पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना वैद्यकीय मदत व मार्गदर्शन करण्यात येत आहे. भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत “भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्ष” अंतर्गत महागड्या शस्त्रक्रियांसाठी धर्मदाय योजना, पंतप्रधान वैद्यकीय मदत निधी, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच विविध खाजगी ट्रस्ट यांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी समन्वयकाची भूमिका पार पाडली जाते. यामध्ये गरजू रुग्णांना अल्प दरात अथवा मोफत उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री सहायता निधी योजनेत कॉकलियर इम्प्लांट, हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, अस्थिमज्जा व हात प्रत्यारोपण, हिप व गुडघा बदल, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, बालकांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, डायलिसीस, कर्करोगासाठी किमोथेरपी/रेडिएशन, हृदयरोग, नवजात शिशूंचे आजार, बर्न व विद्युत अपघात अशा व...

पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन

पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन – विष्णुदादा भोसले पुरंदर : पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक वर्ग २ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे १२ फूट रुंदीचा रस्ता मंजूर करून पीडित शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान करण्यात आले आहे. ही कारवाई पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी आर्थिक तडजोडीतून अधिकाराचा गैरवापर करत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचप्रमाणे सासवडचे मंडलाधिकारी सुहास कांबळे यांनी खोटा स्थळ पाहणी अहवाल सादर करून संबंधित अर्जदारास मदत केल्याचा गंभीर आरोप आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांकडून करण्यात...

भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी भैरव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना संस्थापक अध्यक्ष विजय जाधव

भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी भैरव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना. पुणे : समाजातील गोरगरीब, भटक्या विमुक्त, वंचित व दुर्लक्षित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी एक महत्त्वपूर्ण सामाजिक पाऊल उचलले आहे. त्यांच्या संकल्पनेतून भैरव क्रांती सेना संचलित भैरव शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ग्रामीण तसेच शहरी भागांतील भटक्या विमुक्त वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचा ठाम निर्धार या संस्थेमार्फत व्यक्त करण्यात आला आहे. भैरव शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, नैतिक मूल्यांची जोपासना तसेच सामाजिक जाणीव निर्माण करणारे विविध उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहेत. शिक्षणाच्या प्रकाशाने प्रत्येक घर उजळावे आणि समाज सक्षम व्हावा, हा या संस्थेच्या कार्यामागील मू...